Breking News
जय गणेश पालकत्व योजना आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाशिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागवैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन

मोबाईल हॅक करून महिलेला पावणेसहा लाखांचा गंडा

मोबाईल हॅक करून महिलेला पावणेसहा लाखांचा गंडा

सिंहगड रोड परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – मोबाइल हॅक करून सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलचा ताबा घेतला. त्यानंतर बँकखात्याचा अ‍ॅक्सेस घेउन खात्यातून ४६ हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली. त्यांच्या नावावर क्रेडीट कार्ड पाठवून त्याद्वारे सव्वा पाच लाख रूपयांचे व्यवहार करीत मिळून ५ लाख ७१ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ३० डिसेंबर २०२५ ते २ मार्च २०२६ कालावधीत सिंहगड रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मोटारीची काच फोडून ऐवजाची चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रोड परिसरात राहायला असून, ३० डिसेंबरला सायबर चोरट्यांनी महिलेचा मोबाइल हॅक केला. त्यांच्या बँकखात्याचा ताबा घेउन ऑनलाईनरित्या ४६ हजार रूपये वर्ग करून घेतले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या नावावर क्रेडीट कार्ड पाठवून दिले. मात्र, महिलेला क्रेडीट कार्ड मिळण्याआधीच सायबर चोरट्यांनी त्याद्वारे तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचे व्यवहार केले. तब्बल पावणेसहा लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×