Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

मोटारीची काच फोडून ऐवजाची चोरी

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटारीची काच फोडून चोरट्यांनी १५ हजारांची रोकड, मोबाइल, सोन्याची अंगठी असा मिळून ४२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २७ मे रोजी विमाननगरमधील टाटागार्ड रूमजवळ घडली आहे. याप्रकरणी खराडीतील तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण खराडीत राहायला असून, २७ मे रोजी तो टाटागार्ड रूमजवळ मोटार उभी करून गेला होता. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या मोटारीची काच फोडून १५ हजारांची रोकड, मोबाइल, सोन्याची अंगठी असा मिळून ४२ हजारांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार आल्यानंतर त्यांना गाडीची काच फोडून चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करीत आहेत.

पादचार्‍याकडील ५० हजारांची रोकड चोरीला

बँकेत रक्कम जमा करण्यासाठी निघालेल्या एकाचा पाठलाग करून चोरट्याने ५० हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना २५ मे रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास कर्वेनगर चौक शेजारी घडली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय व्यक्तीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कर्वेनगरमध्ये राहायला असून, २५ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते ५० हजार रूपये घेउन बँकेत जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी चोरट्याने त्यांचा पाठलाग करून तक्रारदाराच्या पॅन्टच्या खिशातून रोकड काढून चोरी केली. काही अंतरावर गेल्यानंतर संबंधिताला खिशात पैसे नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×