Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

सायकल रॅलीतून मतदान जनजागृती

मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी बारामतीत सायकल क्लबची पुढाकार

marathinews24.com

बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघात मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी बारामती तालुक्यात सायकल क्लबच्या माध्यमातून विशेष प्रचार-प्रसिद्धी अभियान राबविण्यात आले. ही जनजागृती मोहीम निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे तसेच सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर – सविस्तर बातमी

यावेळी तालुका प्रचार-प्रसिद्धी प्रमुख सविता खारतोडे यांच्यासह बारामती सायकल क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मतदान प्रतिज्ञेने करण्यात आली. त्यानंतर तीन हत्ती चौकातून सायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी“मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो ” अशा घोषणा देण्यात आल्या. सायकल रॅलीद्वारे नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत आगामी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, सर्व सायकल क्लब सदस्यांनी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करत इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करण्याचे आवाहन यावेळी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×