Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी

marathinews24.com

बारामती – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विधानसभेच्या २०१-बारामती मतदारसंघासाठी दि. २३ एप्रिल २०२६ रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भय व सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी संबंधित मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

आयटीएमएस’ प्रकल्प अंतिम टप्यात – सविस्तर बातमी

या आदेशानुसार, बारामती मतदारसंघातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी हे कामानिमित्त मतदान क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे.
सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना लागू राहील. यामध्ये खाजगी कंपन्या, दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, शॉपिंग मॉल्स, आयटी कंपन्या तसेच विविध व्यापारी व औद्योगिक आस्थापनांचा समावेश आहे.

दरम्यान, अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक राहील. याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांवर असेल.

मतदानासाठी आवश्यक सुट्टी अथवा सवलत न दिल्यामुळे कर्मचारी मतदानापासून वंचित राहिल्यास, संबंधित आस्थापनांविरुद्ध प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×