घरफोडी गुन्ह्यातील ५ लाखांचा ऐवज तक्रारदारांना केला सुर्पूद
marathinews24.com
पुणे – घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेउन बिबवेवाडी पोलिसांनी संबंधित टोळीकडून ५ लाख २५ हजारांचे दागिने जप्त केले होते. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना दागिने सुर्पूद करीत वाहवा मिळविली आहे. याप्रकरणी फिर्यादीने बिबवेवाडी पोलिसांचे आभार मानून, कामाच्या तत्परतेबद्दल कौतुक केले आहे.
नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय तेजीत, आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
बिबवेडीतील गुंफन अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या दरवाजाचे ग्रील तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. कपाटाचे लॉकर उचकटून घरफोडी केल्याची घटना २३ ते २४ मे २०२४ रोजी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली. सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाद्वारे पथकाने टोळीचा पर्दापाश केला. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले ९५ ग्रॅम सोन्याचे ५ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले. विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय ३५ रा. रामटेकडी हडपसर) आणि अब्दुला ताहिरबक्ष शेख ( वय ५८ रा. पनामापार्क सोसायटी, पोरवाल रोड, धानोरी पुणे) यांना अटक केली होती.
जप्त केलेल्या दागिने तक्रारदारांना वेळेत माघारी मिळवून देण्यासाठी बिबवेवाडी पोलिसांनी प्राधान्य दिले होते. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र ४, शिवाजीनगर पुणे यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंंखे यांच्या हस्ते तक्रारदार जितेंद्र गंगाधर साखरे यांना ऐवज सुर्पूद केला. यावेळी त्यांनी बिबवेवाडी पोलिसांच्या कामाचे कौतुक करीत आभार मानले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, तपास पथकातील अधिकारी उपनिरीक्षक अशोक येवले, महिला पोलीस अंमलदार मुजुमले, जाधव, पाटील, चिकणे, वलटे, शेंद्रे, साळुंखे यांनी केली.