भाईगिरी करणाऱ्याला विमानतळ पोलिसांनी केले स्थानबद्ध
marathinews24.com
पुणे – नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून दादागिरीसह भाईगिरी करणाऱ्या सराईताला एक वर्षासाठी वर्धा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. त्याने विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना वेठीस धरल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने विमानतळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. सोहेल सलीम मुल्ला (रा एसआरए, विमाननगर) असे स्थानबद्ध केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
बिबवेवाडी पोलिसांची अशीही कार्यतपरता – सविस्तर बातमी
आरोपी सोहेल सलीम मुल्ला हा सराईत असून, त्याच्यावर विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृत्यामुळे विमाननगर परिसरातील नागरिक दडपणाखाली वावरत होते. तसेच वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यापार्श्वभूमीवर विमानतळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सादर केला. त्यानुसार सोहेल मुल्ला याला स्थानबध्द करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. आरोपीला एसआरए विमाननगर येथुन ताब्यात घेवुन त्याची रवानगी वर्धा मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) आशालता खापरे सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, गिरीष नाणेकर, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु क-हे, राहुल नाणेकर अर्चना शिंदे यांनी केली.