१२ मोबाईल जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकासह पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना टार्गेट करून त्यांचे मोबाईल हिसकावणाऱ्या दोघा चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे १२ मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तुषार अविंता लोखंडे ( वय २० रा. पाटील इस्टेट ,शिवाजीनगर) आणि गणेश संजय पोळके (वय २३ रा.पाटील इस्टेट, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
स्वारगेट एसटी स्टँडसह पीएमपीएल बस स्थानकावर चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस युवराज नांद्रे यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, ठोंबरे, कुडाळकर यांना सुचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.संबंधित भागात सकाळी गर्दीच्या वेळी गुन्हे प्रतिबंधक गस्त घालण्यात येत होती. २८ एप्रिलला सकाळी सहाच्या सुमारास पथक गस्तीवर असताना दोघेजण स्वारगेट पीएमपीएल बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीत संशयितरित्या वारंवार फिरत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे पथकाने त्यांना हटकले असता ते पळुन जावु लागल्याने त्यांचा पाठलाग करून जागीच ताब्यात घेतले. चौकशीत तुषार लोखंडे आणि गणेश पोळके अशी नावे त्यांनी सांगितली.
आरोपी तुषार लोखंडे याच्याकडील सॅकची पडताळणी केली असता त्यामध्ये वेगवेगळया कंपन्यांचे ६ मोबाईल मिळुन आले. मोबाईल फोनबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, अश्रुबा मोराळे, प्रशांत टोणपे यांनी आरोपींकडे कसुन चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याकडून आणखी ६ मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांनी १२ मोबाईलस्वारगेट बसस्टॅन्ड परिसर, पुणे स्टेशन व शिवाजीनगर बस स्टॅन्डमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक विकास भारमळ, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, उपनिरीक्षक अशोक पाटील, अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, ठोंबरे, कुडाळकर, प्रशांत टोणपे, सुजय पवार, दिपक खेंदाड, फिरोज शेख, हनुमंत दुधे, रमेश चव्हाण, संदीप घुले यांनी केली आहे.