खंडणी विरोधी पथक दोनने आरोपींना ४८ तासात पकडले
Marathinews24.com
पुणे – सोन्याचे दागिने आपल्याला मिळावे, लालसेने जमीन कसणार्या वाटेकर्यानेच शेतकर्याचा खून केल्याची घटना ११ एप्रिलला सांगरुन हवेली गावात घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणी विरोधी पथक दोनने अवघ्या ४८ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने सोन्याचे दागिने विक्री केली होती. या दोघांनाही पोलिसांनी बुलढाण्यातून अटक केली आहे. नारायण उर्फ नाना पांडुरंग मानकर (वय ७३ रा. लोकेश सोसायटी, बिबवेवाडी ) असे खून झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
पुण्याच्या उद्योजकाचा बिहारमध्ये निर्घृण खून – सविस्तर बातमी
सतिश विठ्ठल खडके (वय ३६ रा. सांगरुन ता.हवेली ) कल्पना वानखेडे (रा. आंबुडा ता. खामगाव जि.बुलढाणा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मानकर कुटूंबिय मूळचे हवेलीतील सांगरून गावचे असून, त्याठिकाणी त्यांची शेतजमीन आहे. शेतीची कामे करण्यासाठी नानासाहेब ११ एप्रिलला बिबवेवाडीतून मोटारीतून गावी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी शेतजमीन वाटेकरी सतीश खडके याच्यासोबत दिवसभर काम केले. मात्र, संध्याकाळच्या सुमारास आरोपी खडकेने दागिने चोरीच्या उद्देशाने नारायण यांच्यावर शस्त्राने वार करून मोटारीतच खून केला. त्यांचे १८ ते १९ तोळे दागिने काढून घेतल्यानंतर मृतदेह गाडीतच ठेउन आरोपी पसार झाला होता.
तांत्रिक तपासादरम्यान आरोपी सतिश खडके याने त्याची मैत्रीण कल्पना वानखेडे हिच्या मदतीने सोन्याचे दागिने विक्री केल्याची माहीती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोन बुलढाण्याला रवाना केले. पथकाने सतिश विठ्ठल खडके आणि कल्पना वानखेडे यांना १४ एप्रिलला ताब्यात घेत उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, संग्राम शिनगारे, आजिनाथ येडे, अमोल राऊत, दिलीप गोरे, प्रशांत शिंदे, पवन भोसले, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी केली.
जमीनीचा वाटेकर्याची वाटमारी
कसण्यासाठी दिलेली जमीन धान्य पिकवून करण्याऐवजी वाटेकर्याने थेट मालकाचा लुटण्याचा डाव रचला. दिवसभर काम केल्यानंतर त्याने धारदार शस्त्राने वयोवृद्ध शेतकर्याचा खून केला. त्यांच्या अंगावरील दागिने घेउन मैत्रिणीच्या मदतीने विकण्याचाही प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.