पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा दणका
Marathinews24.com
पुणे – शहरातील विविध ठिकाणी लुट, खुनाचा प्रयत्न, खंडणी, घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करण्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत सनी शंकर जाधव याच्यासह टोळीवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.
टोळीप्रमाख सनी शंकर जाधव ( वय २६ रा. चैत्रबन वसाहत बिबवेवाडी) सलमान हमीद शेख ( वय २५ रा. दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) हर्षल संतोष चव्हाण ( वय १९ रा. पवळे चौक, कसबा पेठ, शक्ती गुरव रा. लातूर) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. शक्ती गुरव याला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नसून त्याचा शोध सुरू आहे.
अत्याचाराला विरोध केल्याने महाविद्यालयीन तरुणीचा केला खून – सविस्तर बातमी
टोळी प्रमुख सनी जाधव आणि टोळीवर जबरदस्तीने लूटमार, मारहाण करणे, अवैध मार्गाने घातक शस्त्र बाळगणे, घातक हत्यारांसह दुखापत करणे, लोकांना दमदाटी करुन हत्याराचा धाक दाखवुन मारहाण करणे, जबरदस्तीने मालमत्ता लुटणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे जाधव व टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२),३(४) प्रमाणे कारवाई करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्ष शंकर साळुंखे यांनी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना पाठविला होता.
कागदपत्रांची तपासणी करून सनी जाधव टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली..ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर सांळुखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)।सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, सर्व्हेलन्स पथकातील पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, हवालदार प्रशांत धोत्रे, संतोष जाधव, पोलीस अंमलदार अनिल कर्चे, प्रतिक करंजे यांनी केली.