तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा
marathinew24.com
पुणे – रिक्षात सीट भरण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दोन तरुणांनी मिळून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करत शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी (२२ एप्रिल) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विशाल महादेव जाधव (रा. वैष्णवी, आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) यांनी मार्वेâडयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन महादेव कांबळे (वय २५, रा. शिवतेज नगर, बिबवेवाडी) व संगीत साबळे (वय २६, रा. बिबवेवाडी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : बँक खात्यातून ५८ हजार रुपये गायब – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल जाधव हे मार्वेâटयार्ड गेट नंबर चार समोर थांबले होते. त्याचवेळी रिक्षा सीट भरण्याच्या कारणावरून त्यांचा चेतन कांबळे व संगीत साबळे यांच्याशी वाद झाला. वादातून संतप्त झालेल्या दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला करत शिवीगाळ केली. घटनेवेळी परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र, भांडण सोडविण्यासाठी कोणीही मदत केली नसल्याचे काहीजणांनी सांगितले. घटनेची माहिती मार्वेâटयार्ड पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने पोलीस दाखल झाले होते. त्यानंतर संबंधित हल्लेखारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.