जगदाळे, गनबोटे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर
marathinews24.com
जम्मू – काश्मीरमधील पहलगाम झालेल्या हल्ल्यात पुण्यातील दोघेजण गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान दोन्ही जखमींचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली आहे. संतोष जगदाळे (रा. कर्वेनगर वेदांतनगरी) आणि कौस्तुभ गनबोटे (रा. कात्रज) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. गनबोटे हे पुण्यातील प्रसिद्ध फरसाण विक्रेते होते. द रेसिस्टंस फ्रंटने (टीआरएफ) यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सलूनमधील चौकटीच्या अंगठा चोरीला गेल्या – सविस्तर बातमी
पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. हल्ल्यात किमान २७ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांचा समावेश आहे. प्रामुख्याने कर्वेनगर आणि कात्रजमधील दोघा तरुणांना दहशतवाद्यांनी गोळया मारल्या, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गनबोटे आणि जगदाळे तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, पुण्यासह राज्यातील अनेक पर्यटक उन्हाळ्यात जम्मू काश्मीरमधील वातावरण अनुभवण्यास जातात. सध्या हल्ल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आटोकाट प्रयत्न केले.
दहशतवादी हल्ल्यात आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. ही कुटुंब मुळची बारामती तालुक्यातील असून सध्या कर्वेनगरमध्ये वेदान्तनगरीजवळ राहायला आहेत. हल्ल्यात संतोष आणि कौस्तुभ यांना गोळ्या लागल्या आहेत. त्यापैकी एकाच्या अंगात तीन गोळ्या घुसल्या आहेत. हल्ला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‘बैसारन’ नावाच्या हिरव्यागार कुरणाजवळ झाला. अचानक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार सुरू केला. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात गोंधळ उडाला होता. जखमींना तात्काळ अनंतनाग व श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सुरक्षा दलांनी परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.