Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सलूनमधील कामगार महिलेच्या अंगठ्या चोरीला गेल्या

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

२६ हजार रुपयांचे दागिने गायब

marathinews24.com

पुणे – सलूनमध्ये काम करणार्‍या २४ वर्षीय महिला कर्मचार्‍याच्या सोन्याच्या अंगठ्या चोरून नेण्याची घटना बाणेरमध्ये घडली आहे. याप्रकरणी अंजली राज जोगदंड यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केला आहे. ही घटना ९ एप्रिलला सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अंजली काही दिवसांपासून सलून ओपल कंपनीच्या ‘कपिल क्लासिक’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. ९ एप्रिलला ती ड्युटीवर आली तेव्हा तिने तिच्या हातातून ३ ग्रॅम १७० मिलीग्राम, २ ग्रॅम २७० मिलीग्राम आणि १ ग्रॅम ९४० मिलीग्राम वजनाच्या तीन अंगठ्या काढून बॅगेत ठेवल्या होत्या.

नोकरदारांनीच चोरले टॅब, सीपीयू अन कॅम्प्युटर – सविस्तर बातमी 

संबंधित बॅग चेंजिंग रूममध्ये ठेवली असता, दिवसभर काम संपवून घरी जाण्यासाठी अंजलीने तयारी केली. त्यावेळी तिला बॅगेत ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या गायब असल्याचे दिसून आले. तिने सलूनमधील व्यवस्थापक हंसिता राजू सत्यनारायण, नेहा राहुल रसगर आणि पीयूष नकुम यांच्यासह इतर कर्मचार्‍यांकडे चौकशी केली, परंतु कोणीही दागिन्यांबद्दल माहिती दिली नाही. चोरीचा संशय अज्ञात व्यक्तीवर असून, ं संबंधिताने गुपचूप बॅग उघडून दागिन्यांची चोरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×