Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

नोकरदारांनीच चोरले टॅब, सीपीयू अन कॅम्प्युटर

 

येरवड्यातील इंटरनॅशनल इंटेरियर कॉन्ट्रेक्टर कंपनीतील घटना

marathinews24.com

पुणे – कंपनीत काम करणार्‍या नोकरदारांनी कॅम्प्युटर, टॅब, सीपीयू चोरल्याची घटना २८ मार्चला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील इंटरनॅशनल इंटेरियर कॉन्ट्रेक्टर प्रायव्हेट लिमीटेड कंपनीत घडली आहे. चारजणांनी मिळून कंपनीतील ३ लाख ७७ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पादचारी तरूणाची ५२ हजारांची सोन्याची चैन हिसकावली – सविस्तर बातमी 

आमीर अमानत शेख (रा. पारगेनगर, कोंढवा), करीम शेख (रा. श्रीसाई पीजी वडगाव शेरी), मिनाज शेख (रा. येवलेवाडी), आतिया शेख (रा. युनीटी पार्क रोड, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद उमर खान (वय ३५ रा मलीकनगर, कोंढवा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद खान यांची इंटरनॅशनल इंटेरियर कॉन्ट्रेक्टर प्रायव्हेट लिमीटेड कंपनी असून, त्यामध्ये आरोपी वेगवेगळ्या पदावर कामाला होते. २८ मार्चला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चौघाजणांनी संगणमताने कंपनीतील कॅम्प्युटर, टॅब, सीपीयू चोरल्याची घटना घडली. काही दिवसांनी कंपनीतील साहित्याचे मोजमाप केल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. सीसीटीव्ही फुटेजनुसार कामगारांनीच चोरी केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×