सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या,पतीसह सासू-सासर्यांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – लग्न झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांतच नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून संसाराचा डाव मोडला आहे. २१ वर्षीय महिलेने ळफास घेउन आत्महत्या केली आहे. माहेरहून पैसे आणावेत यासाठी तिचा सातत्याने छळ केला जात होता. तिला टोचून बोलले जात असल्यामुळे कंटाळून लग्नानंतर सहाच महिन्यांत नवविवाहितने जीवन संपविल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना २२ एप्रिलला देवाची उरळी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासू-सासरे, इतर नातेवाईकांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मैत्रिणीला भेटायला आला आणि वांटेड तडीपार जाळ्यात अडकला – सविस्तर बातमी
मोहिनी आकाश करनुरे (वय २१ ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आकाश विलास करनुरे (वय २७), सासरा विलास नारायण करनुरे (वय ५६) सासू शोभा विलास करनुरे (वय ४८ सर्व रा. ओसवाल मळा, उरळी देवाची ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर माशाळे (वय ४६ रा. उमरगा, धाराशिव) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिनी आणि आकाश यांचे ऑगस्ट २०२४ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर मोहिनी नांदत असताना तिच्या सासरच्यांनी छळ करण्यास सुरवात केली. माहेरहून पैसे आणावेत, यासाठी तिला टोचून बोलणे सुरू केले. सततच्या छळाला कंटाळून मोहिनीने गळफास घेउन जीवन संपविले आहे. याप्रकरणी फिर्याद दाखल होताच, फुरसुंगी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.