चंदननगरमध्ये इमारतीमधील फ्लॅटला आग

चंदननगरमध्ये इमारतीमधील फ्लॅटला आग

marathinews24.com

पुणे – शहरातील चंदननगर भाजी मंडईलगत इमारतीत आग लागल्याची घटना २४ एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास घडली. आगीची वर्दि मिळताच दलाकडून येरवडा, बी टी कवडे रोड व नायडू अग्निशमन केंद्र येथील वाहने व एक वाॅटर टँकर रवाना केली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

पुण्यात १०० हुन अधिक पाकिस्तानी नागरिक, डिपोर्ट कारवाईची प्रकिया लवकरच होणार –  सविस्तर बातमी 

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचताच तीन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर सदनिकेत आग लागल्याचे पाहताच प्रथम इमारतीत व त्या सदनिकेत कोणी अडकले नाही याची खाञी केली. लगेचच आगीवर पाण्याचा मारा सुरु केला व आग पुर्ण विझवत धोका टाळला. सदनिकेत असणारया सर्व गृहपयोगी वस्तु, इलेक्ट्रीक वायरिंग, रक्कम इत्यादी जळाल्याने मोठे नुकसान झाले. घरामध्ये असणाऱ्या आज्जी यांना रहिवाशांनी वेळेवर बाहेर घेतल्याने कोणी जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही..या कामगिरीत सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, वाहनचालक हनुमंत चकोर, दत्ता आढळगे, सुयोग देवळे, तांडेल नवनाथ वायकर, मंगेश टकले व फायरमन छगन मोरे, विष्णु जाधव, आदिनाथ फेगडे, श्रीराम कराड, सुभाष खाडे, महेश पांडे, श्रेयस मेटे, बापू राऊत यांनी सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top