विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – दुचाकींची चोरी करणाऱ्या त्रिकुटाचा विश्रांतवाडी पोलिसांनी पर्दापाश केला आहे. संबंधित चोरट्यांना अहिल्यानगरमधील जामखेडमधून ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. आतीक बाबा शेख वय २२ रा. कवडगाव, ता. जामखेड जि. आहिल्यानगर ) चांद नुरमहंमद शेख ( वय २० रा पिंपरखेड, ता. जामखेड) चेतन ज्ञानेश्वर साळवे (वय १९ रा रामगडवस्ती, कळस माळवाडी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यांतर्गत दाखल वाहन चोरीच्या गुन्हयांचा तपास केला जात होता. मोटार सायकली चोरुन नेणारे चोर हे जामखेड भागातील असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार अंमलदार बादरे, भोसले, शेख, गाडे, जाधव,चपटे, यांची टीम जामखेड भागात रवाना केली. पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेतला. त्यानुसार आतीक शेख, चांद नुरमहंमद शेख, चेतन साळवे यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आणून अटक करीत १ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. त्यामध्ये बुलेट, पल्सर व ज्युपीटरचा समावेश आहे.
आरोपींकडे केलेल्या तपासात विश्रांतवाडी, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलीस उपनिरीक्षक विशाल माने, बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर जाधव यांनी केली आहे.
खबरांचे नेटवर्क असलेले पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले
पुणे पोलीस दलात सध्या विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले हे खबऱ्यांचे नेटवर्क असलेले अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांनी यापूर्वी चतुशृंगी, डेक्कन पोलीस ठाण्यात तपास पथकाचे अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्याठिकाणीही त्यांनी विविध गंभीर गुन्ह्याची उकल करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, आठच दिवसांपूर्वी ते विश्रांतवाडी ठाण्यात तपास अधिकारी म्हणून रूजू झाले आहे. त्यानंतर लगेचच दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची टीप त्यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या परवानगीने त्यांनी तात्काळ या प्रकरणातील आरोपींचा जामखेडमधून माग काढत त्यांना अटक केली आहे.