अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी
marathinews24.com
पुणे – गांजा तस्करीच्या प्रयत्नात असलेल्या तिघा आरोपींना अमली पदार्थ विरोधी पथकदोनने अटक केली आहे. दोन कारवायांमध्ये धुळे आणि ओडीसातून आलेल्या आरोपींकडून तब्बल ६४ किलो गांजा जप्त केला आहे. दोन्ही कारवाईत १३ लाख २८ हजारांचा गांजा जप्त करण्यात पथकाला यश आले आहे. पप्पु चक्रधर देवरी ( वय ३२ रा.गांव कलंड,ता. रसलपुर जसपुर राज्य ओरीसा) चंदन सुभाष कुंवर ( वय १९ , रा.न्यु तरोल,सेनापती कॉलनी, गांव जगतपुर, ओरिसा) यांना अटक केली आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
संबंधित आरोपींविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंड्डी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, सय्यद साहिल शेख, उदय राक्षे, अझिम शेख,युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, निलम पाटील यांनी केली.