Breking News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी येथे स्वागतमोशीतील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभाकरीता बँक तपशील भरण्याचे आवाहनखाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावलबांबू लागवडीसाठी टार्गेट घेऊन काम करावे – पाशा पटेलपुण्यातील कोंढव्यात तरुणीचे पाकिस्तान प्रेम; सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबादची केली पोस्टपिंपरी चिंचवड परिसरातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील – पर्यटन मंत्री शंभूराज देसाईनागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकरसावधान…प्रखर लेझर साेडण्यास बंदीपावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती पाडा, पुणे पोलिसांचा इशारा

पुण्यातील कोंढव्यात तरुणीचे पाकिस्तान प्रेम; सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबादची केली पोस्ट

कोंढवा पोलिसांनी तरूणीला केली अटक

marathinews24.com

पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम याठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, सोशल मीडियावरही आता पाकड्यांच्या समर्थनार्थ चक्क तरुणीने पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे. पाकिस्तान जिंदाबाद अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर व्हायरल केली होती. याप्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध बीएनएस १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३5३ कलामानुसार गुन्हा दाखल करीत तिला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

सावधान…प्रखर लेझर साेडण्यास बंदी – सविस्तर बातमी

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित युवतीने सोशल मीडिया अकाउंटवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा स्वरूपाची पोस्ट केल्याने खळबळ उडाली असून, तिला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित तरुणीला ताब्यात घेतले असून, तिच्या विरोधात राष्ट्रद्रोहासारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिची चौकशी सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी प्रकरणावर लक्ष ठेवून असून, सोशल मीडियावर द्वेषजनक किंवा देशविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कोट- सोशल मीडियाद्वारे पाकिस्तान जिंदाबाद अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी संबंधित तरुणविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तिला अटक देखील करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. – डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, झोन चार

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top