बांबू शेतीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज; पाशा पटेल
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यात बांबू लागवड लोकप्रिय असली तरी उर्वरित पुणे जिल्ह्यात बांबू लागवड झालेली नाही. या पुढील काळात क्षेत्रिय स्तरावर कर्मचाऱ्यांना व्यक्तीशा टार्गेट देऊन मराग्रारोहयो अंतर्गत बांबू लागवडीचे ध्येय निश्चित करण्याचे पुणे जिल्ह्यातील यंत्रणांनी ठरवले असून त्या कामी मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांचे सहकार्य घेण्याचे निश्चित झाले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवड अभियान विषयक आढावा बैठक (ता.9) मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या महत्त्वाच्या बैठकीला उपजिल्हाधिकारी रोहयो डॉ. चारुशीला देशमुख-मोहीते, डॉ. कृपाण घोष, प्रमुख, अँग्रीमेट विभाग,के.सी.साई कृष्णन, प्रमुख, डॉ.ओ.पी श्रिजीत, , डॉ. एस.डी. सानप, आरती बंडकर, शास्रज्ञ , नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक अधिकारी आर. वाय. पाटील, कार्यकारी अभियंता विश्वासराव बैठकीला उपस्थित होते.
डॉ. चारुशीला देशमुख-मोहीते म्हणाल्या, 2024-25 साठी 300 हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. 2025-26 साठी 450 हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले. एकूण पाच वर्षातील 3000 हेक्टर उद्दिष्ट पैकी २०२४-२५ मध्ये १३३.६ हेक्टर इतकी लागवड झाल्याचे सांगितले. तसेच यावर्षी सर्व यंत्रणांना मागील वर्षीचे शिल्लक उद्दिष्ट व या वर्षीचे उद्दिष्ट नुसार सर्व यंत्रणांना जास्तीच उद्दिष्ट वाटप करून प्रति ग्रामसेवक, कृषी सहाय्यक,आर एफ ओ व मृद व संधारण आणि जलसंपदा विभागाला उद्दिष्ट देऊन यावर्षी 1000 हेक्टर चे उद्दिष्ट साध्य करु असे सांगितले.
पाशा पटेल म्हणाले,पुणे जिल्ह्यामध्ये क्षमता असूनही बांबू लागवडी मध्ये दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. वातावरण बदलाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. इस्रायलमधील तेल अविव आणि अमेरीकेत कैलिफोर्निया आग लागली.
2024 हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून दिल्ली तापमान ५२.९ डिग्री परंतु गेल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.47 डिग्री तापमानामध्ये माणुस मरतोय. दुबई होरपळतेयं तिथे तापमान ६५ डिग्री पर्यंत पोहोचले आहे. एकंदरीतच वातावरण बदलाच्या संकटामुळे मानवजातीसमोरचे सगळे मार्ग खुंटले आहेत, असे ते म्हणाले.
कार्बन इमिशन ( उत्सर्जन) दिवसेंदिवस वाढत आहे. 2050 पर्यंत समुद्र किनारी असणारे देश आणि शहरे बुडणार आहेत.कोळसा आधारित औष्णीक प्रकल्प बंद करावे लागणार आहेत. सर्वांनाच आता पर्यावरण पुरक वस्तु वापराव्यात लागणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.वेगाने वाढणारा बांबु एकमेव गवत वर्गीय वृक्ष असून बांबू बहु उपयोगी ठरत आहे.
भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस.डी. सानप म्हणाले, ‘औद्योगिक विकासाने कार्बन उत्सर्जन वाढले आहे. पारंपारिक उर्जा स्रोत वापराने कार्बन इमिशन वाढले. त्यामुळे वातावरण बदल होऊन कृषी क्षेत्राला वातावरण बदलाचा मोठा फटका बसत आहे. तापमानातील वाढ, कमी कालावधीत जास्त पाऊस, ढगफुटी, वादळे घटक शेती बरोबरच आरोग्य वनक्षेत्र आणि जलसंधारण या विभागांना प्रभावित करत असल्याचे कडे त्यांनी लक्ष वेधले.पुणे जिल्ह्याचा विचार करता फक्त भोर आणि बिल्ला तालुक्यांमध्ये पारंपारिक रित्या बांबूच्या गोड होत आहे परंतु क्षमता असू नये शिरूर सह आंबेगाव आणि जिल्ह्यातील अनेक भागात ज्या ठिकाणी सिंचनातून जमिनी नापीक झाल्या अशा भागात देखील बांबू लागवडीसाठी मोठी संधी असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
प्रत्येक यंत्रणेमध्ये क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना टार्गेट देऊनच यापुढील काळात बांबू लागवडीचे ध्येय गाठले जाईल,असे यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी एकमताने आश्वासित केले.