स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना बँक तपशील सादर करण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभास पात्र ठरलेल्या परंतू ऑनलाईन अर्ज करतावेळी बँक तपशिल न भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे; अशा विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता आपल्या महाविद्यालयास संपर्क साधून स्वाधार संकेतस्थळावरील लॉगिनमध्ये बँकेचे तपशील भरावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केले आहेत. तथापि काही विद्यार्थ्यांनी अर्जात बँक तपशिलाबाबत माहिती भरलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरूनही त्यांना अनुज्ञेय रक्कम अदा करण्यास अडचण येत आहे. या विद्यार्थ्यांना बँक तपशील भरण्याबाबत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती खैरनार यांनी दिली आहे.