उत्तमनगर पोलिसांकडून पतीला अटक
marathinews24.com
पुणे – अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरात घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली. दीक्षा भिसे (वय २१, रा. कोंढवे धावडे, एनडीए रस्ता) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पती दीपक भिसे (वय २५) याला अटक करण्यात आली.
पुण्यात तब्बल १२५ कोटींवर जमिनीसाठी अशीही बनवाबनवी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा चालक म्हणून काम करतो. दीपक आणि दीक्षा यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. तो तिच्या चारित्र्याचा संशय घ्यायचा. शुक्रवारी मध्यरात्री दीपकने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून त्याने पत्नी दीक्षाला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या दीक्षाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पत्नीचा खून केल्याप्रकरणी दीपकला अटक केली.