वारजे- मामुर्डीदरम्यान घडली घटना
marathinews24.com
पुणे – पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण करीत टोळक्याने प्रवाशी तरूणाकडील तीन हजारांची रोकड आणि १० हजारांचा मोबाइल चोरून नेला. ही घटना १९ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास वारजे- मामुर्डी प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी कोंढवे धावडे परिसरात राहणार्या ४१ वर्षीय तरूणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्याच्या मोटारीवर गोळीबार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोंढवे धावडे परिसरात राहायला असून, १९ मे रोजी पहाटेच्या सुमारास ते मामुर्डीला जाण्यासाठी वारजेत थांबले होते. त्यावेळी त्यांनी मोटारीला हात दाखविल्यानंतर मोटार चालक त्यांच्याजवळ येउन थांबला. त्यावेळी गाडीत चारजण आधीच प्रवास करीत असल्याचे दिसून आले. तक्रारदार तरूणही मोटारीत बसल्यानंतर चालकाने गाडी मार्गस्थ केली. काही अंतरावर गेल्यानंतर मोटारीत बसलेल्या आरोपींनी तरूणाला पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याकडील ३ हजारांची रोकड आणि मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर पुढे काही अंतरावर टोळक्याने त्यांना मोटारीतून खाली उतरविले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करीत आहेत.