शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ५५ हजार रूपये किंमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. ही घटना १९ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुतळा चौक ते शिवाजीनगर बसस्थानकादरम्यान घडली आहे. याप्रकरणी देहूरोड परिसरात राहणार्या ५६ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पादचारी तरूणाला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार महिला देहूरोड परिसरात राहायला असून, १९ मे रोजी कामानिमित्त शिवाजीनगर परिसरात आली होती. महिला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुतळा चौक ते शिवाजीनगर बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ५५ हजार रूपये किंमतीची सोन्याची पाटली कापून नेली. बसमधून खाली उतरताना महिलेला हातात सोन्याची पाटली नसल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार पवार तपास करीत आहेत.
पीएमपीएल प्रशासन, पोलिसांचेही हात वर
पुणेकरांसह नागरिकांची प्रवासवाहिनी असलेल्या पीएमपीएल बसप्रवासात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी बस स्थानकात चोरटे सक्रिय असून, गलका करीत गर्दीत महिलांचे दागिन्यांसह ऐवज चोरला जात आहे. त्यासोबतच महिलांच्या हातातील पाटल्या कापून चोरून नेणारी टोळीही अॅक्टीव झाली आहे. मात्र, याकडे पीएमपीएल प्रशासनासह स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांना वेळच नसल्यामुळे एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. दिवसेंदिवस लुटमार करणार्या टोळ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे नागरिकांनी प्रवास करावा की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.