चालकाविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे– भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव भागात घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोशनकुमार सिंह (वय २६, रा. विजय विहार, अग्निशमन केंद्राजवळ, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पवनकुमार सिंह (वय २४) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रंगकाम करणार्याने मारला दागिन्यांवर डल्ला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रोशन कुमार सिंह हे रविवारी (१८ मे) दुपारी पावणेचारच्या सुमारास लोहगाव परिसरातून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी विमानतळ रस्त्यावर भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार रोशनकुमारला धडक दिली. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस कर्मचारी ए. ए. आदलिंग तपास करत आहेत.