वारजे परिसरातील दुर्घटना
marathinews24.com
पुणे – विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वारजे परिसरात घडली आहे. मयंक उर्फ दादु प्रदीप आडागळे (वय १०) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. २०) रात्रीच्या सुमारास घरासमोरील विजेच्या खांबाजवळ घडली.
पावसामुळे २० ठिकाणी झाडे पडली; ठिकठिकाणी पाणी तुंबले, वाहतूक संथगतीने – सविस्तर बातमी
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक हा मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घराजवळ खेळत होता. पावसामुळे विद्यूत खांबाला प्रवाह सुरू झाल्यामुळे अचानक त्याला विजेचा शॉक बसला. त्यामुळे धक्क्याने मयंक जागीच खाली कोसळला. त्यावेळी परिसरातून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्याला पाहिले. मुलाला शॉक बसल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने इतरांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत मयंकने जागीच प्राण सोडले होते.
मयंकच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पालकांवर शोककळा पसरली आहे. विजेच्या खांबातील बिनधास्तपणा आणि दुर्लक्षमुळे निष्पाप मुलाला जीव गमवावा लागल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. प्रशासनाने तत्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.