नवले पुलाजवळ वेश्याव्यवसायाचा उघडकीस, महिलांविरुद्ध गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातीलनवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय तेजीत असून, त्याठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या ३ महिलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये (कलम ८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई ज्योती हुलावळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खिशात नाही दमडी, पण गॉगल मिळवण्यासाठी बनला बांधकाम व्यावसायिक – सविस्तर बातमी
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला थांबतात. त्या अश्लील हावभाव करतात. तेथून जाणारे नागरिक, वाहनचालकांना इशारे करतात, अशा तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी नवले पूल परिसरात थांबणाऱ्यी तीन महिलांविरुद्ध कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निंबाळकर तपास करत आहेत.दरम्यान, नवले पूल परिसरातील सेवा रस्त्यावर थांबून काही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या.
संबंधित भागातील रहिवाशांना विशेषत : महिलांना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या भागातील रहिवाशांना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. यापूर्वी पोलिसांनी नवले पूल परिसरात कारवाई करुन वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले होते. कारवाई केल्यानंतर या भागात महिला काही दिवस थांबत नाहीत. त्यानंतर पु्न्हा गैरप्रकार सुरू होतात. नवले पूल परिसरात थांबणाऱ्या महिलांमुळे वाहतुकीस अडथळा होतो, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. नवले पूल सेवा रस्ता परिसरात गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत.