Breking News
रात्रशाळेतील जिद्दीचा विजय; पूना नाईट हायस्कूलचा 89.47 टक्के निकालसैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्नशेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्यसायबर चोरट्यांकडून महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूककेरळ सहलीच्या आमिषाने पर्यटकांची फसवणूकबी.एससी – एचएचए अभ्यासक्रमाकरीता ३१ मेअखेर अर्ज करण्याचे आवाहनशिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘जयतु शंभू’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनमुलांच्या भांडणावरून सुरू झालेला वाद फ्री स्टाईल हाणामारीवर पोहोचलापुण्यात मुसळधार पावसामुळे ५ ठिकाणी झाडे काेसळली

जबरी चोर्‍या करणार्‍या दोघांना बेड्या, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

मोबाईलसह, दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – पिण्याच्या पाण्याची मागणी करीत पादचार्‍याकडून मोबाइल हिसकावून पसार झालेल्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अल्पवयीन साथीदारालाा ताब्यात घेण्यात आले आहे. टोळीकडून मोबाइल, रोकड, दोन दुचाकी असा ८१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मयुर उर्फ बाबु संजय गिरी, (वय १९ रा. वडारवाडी) सुजल राजेश अलकुंटे (वय १८, रा. वडारवाडी पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमित कुमार गौतम (वय २२) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

चोरीच्या मोबाईलद्वारे १० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍याला बेड्या – सविस्तर बातमी

तक्रारदार अमित हा २० एप्रिलला हॉटेलमधील साफ सफाईचे काम उरल्यानंतर शिवाजीनगर गावठाणातुन पायी जात होता. रोकडोबा मंदिराच्या जवळ चौघांनी त्याला थांबवून पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करीत मोबाइल, रोकड हिसकावून नेली. गुन्ह्यातील आरोपींचा उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार संतोष मेमाणे, सचीन जाधव, रोहीत झांबरे शोध घेत होते. त्यावेळी संतोष मेमाणे आणि सचिन जाधव यांना आरोपी हा मॉडेल कॉलनीतील दीपबंगला चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून अजय सुभाष मुथराज (वय १९ रा. जयभवानी नगर, कोथरुड  याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोबाइल, रोकड मिळून आली.

चौकशीमध्ये त्याने अल्पवयीन साथीदारासह मयुर उर्फ बाबु संजय गिरी, सुजल राजेश अलकुंटे यांच्या मदतीने गुन्ह्या केल्याची कबुली दिली. पोलीस शिपाई रोहीत झांबरे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मयुर उर्फ बाबु संजय गिरी आणि सुजल राजेश अलकुंटे यांना वडारवाडीतून ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, एसीपी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार संतोष मेमाणे, हवालदार सचीन जाधव, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, रोहीत झांबरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top