Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

चोरीच्या मोबाईलद्वारे १० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍याला बेड्या

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

खंडणी विरोधी पथकाकडून आरोपीला कोल्हापुरातून अटक

marathinews24.com

पुणे – चोरीच्या मोबाइलद्वारे महिलेला फोन करून तब्बल १० लाख रूपयांची खंडणी मागणार्‍याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोल्हापूरातून अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल व तीन सिमकार्ड जप्त केल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली आहे. पार्थ किरण काकडे (वय २३,रा. कुडचे मळा, इचलकरंजी, जि.कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो गवंडीकाम करत असल्याचे उघडकीस आले आहे.

पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २८ लाखांवर बनावट नोटा जप्त – सविस्तर बातमी

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपी वापरत असलेले मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. उपनिरीक्षक सुनील भदाणे, सुनील कानगुडे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजी गाठले. तांत्रिक विश्लेषण करुन पोलीसांनी पार्थ काकडे व ऋषिकेश वराळे यांचे नाव निष्पन्न केले. त्यानुसार पार्थ काकडे यास कामगार वसाहत इचलकरंजी येथून ताब्यात घेवून सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याचा मित्र ऋषिकेश वराळे व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांचेसह रवीकुमार याचे मोबाईलवरुन तक्रारदार यांना खंडणीसाठी कॉल केल्याचे सांगितले. आरोपींना पुढील तपासकामी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×