शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
marathinews24.com
पुणे – आंबील ओढा सीमाभिंतीचा निधी कुठे गेला? यावरून जोरदार आंदोलन – शहरात २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण पुणे हादरले होते. आंबील ओढ्याने अनेक वस्ती, झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांना पाण्यात बुडवले. प्रलयानंतर शहरात नालेसफाई, अतिक्रमण हटाव आणि सीमाभिंतीची गरज स्पष्ट झाली होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा पूर पुणेकरांच्या जिवावर बेतला. त्याचवेळी प्रशासनाच्या कामकाजावरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
“ससून डॉकमधील मासेमार कामगारांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज” – सविस्तर बातमी
तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे आंबील ओढ्याच्या सीमा भिंतीसाठी पाठपुरावा केला. शासनाकडून २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र पुणे महापालिकेला मिळाले. मात्र, या निधीचे काय झाले, हा मोठा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेत्यांनी आणि तत्कालीन महापौर यांनी या निधीच्या घोषणा करत होर्डिंगबाजी केली, आणि पुणेकरांना गंडवले. प्रत्यक्षात निधी मिळाला नाही, काम झाले नाही आणि पुणेकर पुन्हा संकटाच्या छायेत राहिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यापुढेही पुणेकरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि निधी मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, वेळप्रसंगी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नवीन कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाईल असा निर्धार करण्यात आला.
फसवणुकी विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने दत्तवाडीत आंबील ओढ्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले. “पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या भाजपाच्या खोट्या घोषणांचा निषेध करतो,” २०० कोटी गेले कुठे, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या . आंबील ओढा सीमाभिंत प्रश्न स्थानिक कार्यकर्ते, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी वेळोवेळी मांडला प्रशासनाने त्यावर स्थळ पाहणी केली पण पुढील कार्यवाही होत नाही, हे निष्क्रिय प्रशासनाचे लक्षण आहे.
आंदोलनाचे नेतृत्व शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, यांनी केले. माजी नगरसेवक अशोक हरणावळ, सचिव मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहरप्रमुख पंढरीनाथ खोपडे, आबा कुंभारकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, दिपक जगताप, महिला आघाडीच्या रेखा कोंडे, मनीषा गरुड, विभागप्रमुख चंदन साळुंके, नंदू येवले, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दत्ता घुले, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, तसेच बाळासाहेब गरुड, गणेश घोलप, गिरीश गायकवाड, रूपेश पवार, निलेश वाघमारे, संजय साळवी, किरण जगताप, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, मनोज यादव, विजय जोरी, नितीन दलभंजन, शिवम खोपडे, मोहन देशपांडे, राहुल शेडगे, विनोद वांजले, रमेश लडकत, राजेश शेलार, मनीष घरत, सनी गायकवाड, सचिन बाबर, हृषिकेश गायकवाड, जगदीश रेड्डी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.