Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‌‘महापूर‌’चा प्रयोग

राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‌‘महापूर‌’चा प्रयोग

राजाभाऊ नातू यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर लिखित ‌‘महापूर‌’ या नाटकाचा प्रयोग

marathinews24.com

पुणे – राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‌‘महापूर‌’चा प्रयोग – महाराष्ट्रीय कलोपासकचे माजी चिटणीस कै. राजाभाऊ नातू यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर लिखित ‌‘महापूर‌’ या नाटकाचा प्रयोग भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील स्पर्धक आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रयोग रंगला.

एनव्हायर्नमेंटल क्लबचे पुरस्कार जाहीर – सविस्तर बातमी 

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धेतील प्रयोग नेटका कसा असावा याचे मार्गदर्शन मिळण्यासाठी कै. राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाट्य प्रयोगाचे आयोजन केले जाते. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या मुद्द्यांवर स्पर्धकांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे, असा स्पर्धा संयोजक म्हणून महाराष्ट्रीय कलोपासकचा आग्रह असतो. ‌‘महापूर‌’ या नाटकात आरोह वेलणकर, प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार, दिलीप जोगळेकर यांच्या भूमिका होत्या. तर ऋषी मनोहर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते.

राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‌‘महापूर‌’चा प्रयोग

प्रयोगात सहभागी कलाकारांनी पुरुषोत्तम स्पर्धा गाजविली आहे. सुमारे १३ वर्षांपूर्वी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निमित्ताने भरत नाट्य मंदिरातील रंगमंचावर पाऊल ठेवले होते. ‌‘महापूर‌’ या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा महाराष्ट्रीय कलोपासकसाठी या रंगमंचावर येण्याची संधी मिळाल्याचे आरोह वेलणकर यांनी आवर्जून सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×