Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

PMP Bus Fire Pune : पीएमपी बसला आग; अग्निशामक दलाच्या जवानाची सतर्कता

PMP Bus Fire Pune : पीएमपी बसला आग; अग्निशामक दलाच्या जवानाची सतर्कता

अग्निशमन जवान सुरेश पवार यांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षित काढले बाहेर

marathinews24.com

पुणे – पीमपी बसने अचानक पेट घेतल्याची घटना शिवाजीनगर भागात शुक्रवारी सकाळी घडली. PMP Bus Fire Pune रात्रपाळीहून घरी निघालेले अग्निशामक दलाचे जवान सुरेश पवार यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पुणे स्टेशन ते निगडी या मार्गावरील पीएमपी बस शिवाजीनगर परिसरातून निघाली होती. अचानक पीएमपी बसने पेट घेतला होता.

सीएनजी पंपावर वादातून रिक्षा चालकावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

अग्निशामक दलाच्या कसबा पेठ केंद्रातील जवान सुरेश पवार हे पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात राहायला आहेत. रात्रपाळीहून जवान पवार हे दुचाकीवरुन घरी निघाले होते. पीएमपी बसमधून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे पवार यांनी पाहिले. पवार यांनी तातडीने या घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कळविली. अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पाेहोचेपर्यंत पवार यांनी तत्परता दाखविली. प्रसंगावधान राखून त्यांनी बसमधील वाहक, चालकासह सर्व प्रवाशांना खाली उतरविले.

PMP Bus Fire Pune अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. जवान पवार यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. पीएमपी प्रवाशांनी जवान पवार यांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×