Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

Lohgaon Rickshaw Driver Attack : सीएनजी पंपावर वादातून रिक्षा चालकावर शस्त्राने वार

Lohgaon Rickshaw Driver Attack : सीएनजी पंपावर वादातून रिक्षा चालकावर शस्त्राने वार

लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सीएनजी पंपावर रांगेत झालेल्या वादातून रिक्षाचालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना लोहगाव भागात घडली. Lohgaon Rickshaw Driver Attack या प्रकरणी एका रिक्षा चालकाला लोहगाव पोलिसांनी अटक केली. सुयोग दादाजी जाधव (वय ४९, रा. माळवाडी वस्ती, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालक सुहास मारुती पालवे (वय २६, रा. वैष्णवी पार्क, गाडे वस्ती, वाघोली) याला अटक करण्यात आली. याबाबत जाधव यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भरदिवसा सहकारनगरमध्ये जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक जाधव हे लोहगाव- वाघोली रस्त्यावरील सीएनजी पेट्रोल पंपावर गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास आले होते. Lohgaon Rickshaw Driver Attack  सीएनजी भरण्यासाठी त्यांनी रिक्षा रांगेत लावली होती. त्या वेळी रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद झाला. रिक्षाचालक पालवे याने शिवीगाळ केली. रिक्षात ठेवलेल्या तीक्ष्ण शस्त्राने जाधव यांच्यावर त्याने वार केले. जाधव हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पसार झालेला रिक्षा चालक पालवे याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×