Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

Lohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

Lohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

अग्निसुरक्षेची यंत्रणाच नसलेल्या तीन-चार मजली इमारतींमध्ये १०० हून अधिक विद्यार्थी

marathinews24.com

पुणे – अग्निसुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसलेल्या लोहगावातील निंबाळकरनगरातील ११ विनापरवाना पीजी हॉस्टेलवर पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शुक्रवारी (दि. १८) सीलची कारवाई केली. (Lohegaon Hostel Sealing) तीन-चार मजली इमारतींमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी राहत असल्याचे तपासणीत आढळले. बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यांसह आवश्यक परवानग्यांचा अभाव असल्याने जागामालकांविरुध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पीएमपी बसला आग; अग्निशामक दलाच्या जवानाची सतर्कता – सविस्तर बातमी 

देशभरातील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रुग्णालये, पीजी, होस्टेल आणि क्लासेसचे अग्निसुरक्षा परीक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अग्निशमन प्रमुख गणेश सोनुने यांना दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी अग्निशमन विभागाने पीजी व होस्टेलची तपासणी सुरू केली.

Lohegaon Hostel Sealing लोहगाव-निंबाळकरनगर परिसरातील पीजी व होस्टेलची पाहणी केली असता बहुतांश ठिकाणी अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे आढळले. तीन ते चार मजली इमारतींमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी राहत असल्याचे समोर आले. आग लागल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तत्काळ कारवाई केली. परवानग्यांचा पत्ताच नाही. तपासणीदरम्यान बांधकाम परवानगी, होस्टेल अथवा पीजीसाठी आवश्यक परवानग्या, ड्रेनेज, पाणीपुरवठा, झाडे, स्ट्रक्चरल, कर विभाग तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यापैकी कोणतीही परवानगी उपलब्ध नसल्याचे आढळले.

महाविद्यालयांनाही इशारा

पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. संबंधित विद्यार्थ्यांना परिसरातील महाविद्यालयांनी पीजीसाठी संदर्भ दिल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले. नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी पाठविणाऱ्या महाविद्यालयांवर तसेच जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

 

विविध आस्थापनांची तपासणी

शहरातील शाळा, महाविद्यालये, पीजी, होस्टेल आणि रुग्णालयांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केली जाणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल. अग्निशमन यंत्रणा कार्यरत व सुस्थितीत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अग्निशमन, Lohegaon Hostel Sealing बांधकाम आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पीजी व होस्टेल बंद करून सील केले. विनापरवाना तसेच अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जागा मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×