अंतिम मुदतीची वाट न पाहता ई-पिक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन
marathinews24.com
बारामती – खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी शासनस्तरावरून सुरू असलेली E-Pik Pahani (DCS Mobile App) प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.
‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक – सविस्तर बातमी
सातबारा उताऱ्यावर आपल्या पिकाची अचूक नोंद होण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईल अॅपद्वारे ई-पिक पाहणी करणे आवश्यक आहे. ई-पिक पाहणी नोंदणीसाठी प्रथम संबंधित खात्यात प्रवेश करून शेतकरी म्हणून नोंदणी करावी. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे प्रक्रिया पूर्ण करून जोडलेला गट क्रमांक निवडावा. शेताचे स्थान निश्चित केल्यानंतर शेतातील पिकाची माहिती भरून पिकाचे छायाचित्र घेऊन नोंदणी पूर्ण करावी.
E-Pik Pahani ची नोंद केल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळणे, पीक विमा दाव्यांच्या मंजुरीसाठी तसेच शासनाच्या आधारभूत किंमत (MSP) खरेदीसाठी आणि पीक कर्ज व विविध शासकीय अनुदानांसाठी या नोंदीचा आधार घेतला जातो.
अंतिम टप्प्यात सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता बारामती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमधील ई-पिक पाहणी अॅपद्वारे किंवा गावातील पोलीस पाटील, तलाठी, कृषी सहायक यांच्या मदतीने ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करावी, असेही रावडे यांनी कळविले आहे.






















