Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

Ganeshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

Ganeshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

परंपरा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि परदेशातील उत्सवाचा अनोखा संगम

marathinews24.com

पुणे – सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे डिजिटल सांस्कृतिक संग्रह पोर्टल असलेल्या Bappa.org (Ganeshotsav 2026) वर आजच्या पाच वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव कथांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती उत्सव, घरच्या घरी साकारलेली मातीची मूर्ती, व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांचा उत्सव आणि विसर्जनाच्या मातीतून वृक्षसंवर्धन अशा प्रेरणादायी उपक्रमांचा समावेश आहे.

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन – सविस्तर बातमी 

राज्यातील घरे, स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ऐतिहासिक मंदिरे आणि परदेशातील भारतीय समुदायांच्या गणेशोत्सवातील आठवणींचे डिजिटल जतन या उपक्रमातून करण्यात येत आहे. छायाचित्र आणि गणेशोत्सवाशी संबंधित माहिती पोर्टलवर सादर करणाऱ्या प्रत्येक नागरिक, मंडळ अथवा मंदिर न्यासाला महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र’ देण्यात येते. वैशिष्ट्यपूर्ण नोंदींची दररोज निवड करून शासनाच्या माध्यमांद्वारे त्यांना प्रसिद्धी देण्यात येत आहे.

संजय मंगलाराम यांच्या पुण्यातील नव्या घरात पहिल्यांदाच बाप्पाचे आगमन

Ganeshotsav 2026 दरवर्षी गणेशोत्सवासाठी मूळ गावी जाणाऱ्या संजय मंगलाराम यांच्या कुटुंबाने यंदा पुण्यातील नव्या घरात पहिल्यांदाच गणरायाचे स्वागत केले. कुटुंबातील दोन लहान मुलींनी दैनंदिन पूजा आणि आरतीचे नेतृत्व केले. नव्या पिढीकडे परंपरेचा वारसा सोपविणाऱ्या या कौटुंबिक गणेशोत्सवाची निवड झाली आहे.

गुहागरची पारंपरिक गौरी-गणपती प्रथा

कोकणातील गुहागर परिसरात महिला डोक्यावर पारंपरिक पितळी ताटामध्ये गौरीची मूर्ती, पूजेचे नारळ आणि रानातील तेरड्याचे देठ घेऊन हिरव्यागार भातशेती व गावातील पाणवाटांमधून सामूहिकरित्या मार्गक्रमण करतात. शेती, निसर्ग, स्त्रीशक्ती आणि पूर्वजांच्या परंपरेशी नाते सांगणाऱ्या या शतकानुशतकांच्या प्रथेची निवड करण्यात आली आहे.

निकिता जे. पांचाळ यांची घरच्या घरी मातीची मूर्ती

निकिता जे. पांचाळ यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसची बाजारातील मूर्ती आणि कृत्रिम रंगांचा वापर टाळला. त्यांनी कच्च्या मातीपासून घरच्या घरी गणेशमूर्ती घडवून स्वतः रंगकाम केले. पारंपरिक मातीकलेचे जतन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा त्यांचा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

व्हिएतनाममध्ये विद्यार्थ्यांनी जपली गणेशोत्सवाची परंपरा

महाराष्ट्रापासून दूर व्हिएतनाममध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थी साजरी केली. परदेशात उत्सवासाठी आवश्यक साहित्य मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांनी स्वतः ताजे मोदक तयार केले आणि मित्रांना उत्सवात सहभागी करून घेतले. ईश्वर मनोहर बोरसे यांनी नोंदविलेली ही कथा परदेशातही भारतीय संस्कृती आणि आपल्या मातीशी असलेले नाते जपणारी ठरली आहे.

विसर्जनाच्या मातीतून ३० हून अधिक वृक्षांचे संवर्धन

पराग नारायण शेठ गुजराथी यांच्या कुटुंबात गेल्या ६५ वर्षांपासून एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केला जातो. मागील सहा वर्षांपासून कुटुंब मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून घराच्या गच्चीवरच विसर्जन करते. विसर्जनानंतरच्या मातीत रोपे लावून ती पाच फुटांपेक्षा अधिक वाढेपर्यंत त्यांचे संगोपन केले जाते. त्यानंतर ही रोपे स्थानिक नदीकाठ आणि डोंगर परिसरात लावली जातात. या माध्यमातून आतापर्यंत ३० हून अधिक वृक्ष वाढविण्यात आले आहेत.

नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

Ganeshotsav 2026 राज्यातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिर न्यासांनी महाराष्ट्राच्या अधिकृत सांस्कृतिक डिजिटल संग्रहात सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. सहभागी होण्यासाठी नागरिकांनी Bappa.org या संकेतस्थळावर गणेशमूर्ती अथवा सजावटीचे छायाचित्र अपलोड करून परंपरा, देखावा किंवा सामाजिक उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती नोंदवावी. माहिती यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर शासनाचे अधिकृत डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र देण्यात येईल.

वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, पर्यावरणपूरक कलाकृती आणि समाजोपयोगी उपक्रम असलेल्या नोंदींची दैनंदिन पाच कथांसाठी निवड करून त्यांना शासनाच्या विविध माध्यमांवर प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×