Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

Lullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमी

Lullanagar Roof Collapse

लुल्लानगर भागातील दुर्घटना

marathinews24.com

पुणे – नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारातील पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना कोंढव्यातील लुल्लानगर भागात शुक्रवारी सायंकाळी घडली. (Lullanagar Roof Collapse) लुल्लानगर भागात एका नियोजित गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानांचे काम पूर्ण झाले आहे. तळमजल्यावर ओैषध विक्री, एक उपाहारगृह सुरू झाले आहे. गृहप्रकल्पाचे काम सुरू असल्याने राडारोडा पडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव बांधकाम व्यावसायिकाने ठेकेदाराकडून पत्र्याचे आच्छादन बसवले आहे.

शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खून – सविस्तर बातमी 

तळमजल्यावरील दुकानाच्या बाहेर हे आच्छादन बसविण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास औषध विक्री आणि उपाहारगृहातून दोघे जण बाहेर पडले. त्या वेळी पत्र्याचे आच्छादन अचानक कोसळले. दोघांच्या अंगावर पत्रा कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाला दिली. (Lullanagar Roof Collapse) अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

‘दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. पत्र्याचे आच्छादन कोसळल्याने दोन दुचाकींचे नुकसान झाले. जवानांनी पत्र्याखाली अडकलेल्या दोन दुचाकी बाहेर काढल्या. तळमजल्यावर आणखी कोण थांबले नसल्याची खातरजमा करण्यात आली. दुकानांच्या परिसरात गर्दी असती, तर गंभीर दुर्घटना घडली असती, अशी माहिती अग्निशामक दलाच्या कोंढवा केंद्रातील अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×