एमएनजीएल मीटर अपडेटच्या बहाण्याने जेष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

एमएनजीएल मीटर अपडेटच्या बहाण्याने जेष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एमएनजीएलचे गॅस मीटर अपडेट करून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख ४३ हजार ८४८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार औंध परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर चोरट्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस अंमलदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, १० हजारांची लाच घेताना पकडले’ – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील सानेवाडी परिसरात राहणाऱ्या ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी एका अज्ञात व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने स्वत:ला एमएनजीएलशी संबंधित असल्याचे भासवत गॅस मीटर अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मीटर अपडेट करण्यासाठी केवळ १३ रुपये ऑनलाइन भरावे लागतील, असे सांगून त्याने तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. त्यानुसार तक्रारदाराने आरोपीने सांगितलेल्या पद्धतीने ऑनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्यांच्या बँक खात्याशी संलग्न असलेला मोबाइल अज्ञात कारणाने हॅक करण्यात आला. या माध्यमातून आरोपींना तक्रारदाराच्या बँकिंग व्यवहारांमध्ये प्रवेश मिळाला. आरोपींनी तक्रारदाराच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून विविध व्यवहार केले. या व्यवहारांद्वारे एकूण ३ लाख ४३ हजार ८४८ रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली.

फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात मोबाइल क्रमांकधारक तसेच व्यवहारातील लाभार्थी बँक खातेधारक आणि वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात वीज, गॅस, केवायसी अपडेट, बँक खाते पडताळणी आणि विविध सेवा अद्ययावत करण्याच्या नावाखाली सायबर चोरटे नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही लिंक, मेसेज किंवा फोन कॉलवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित संस्थेकडून खातरजमा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×