Breking News
विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट‘राष्ट्रप्रथम’ ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात रुजवली-पांडुरंग बलकवडेपुण्यात फ्लाईंग जिप्सी कॅफेवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची मर्जीअपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधारअल्पवयीन पीडित मुलीला उपचारासाठी ८ तास ताटकळत ठेवणे डॉक्टरांना भोवले“एक होतं माळीण” चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीजर

पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ काेटीची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष; ज्येष्ठाची १ कोटींची फसवणूक

४५ गुंतवणुकदारांची फसवणूक; तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत आरोपीने ४५ गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निषन्न्न झाले असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत गणेश अनिल घोलप (रा. धनगर आळी, गुरुवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

एमबीबीएसला अ‍ॅडमिशनचे नाव अन लुटीचा डाव – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बावधन परिसरात राहायला आहे. आरोपीशी घोलप यांची ओळख झाली होती. त्या वेळी आरोपीने ‘राजपूत वाईज इन्व्हेस्टमेंट ’नावाची कंपनी असून, संबंधित कंपनीला ‘सेबी’ची मान्यता असल्याची बतावणी केली होती. संबंधित कंपनीकडून शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते. आरोपीने २०२२ ते २०२५ या कालावधीत घोलप यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले.

गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्याने पैसे घेतले होते. घोलप यांच्यासह ४५ जणांकडून त्याने १२ काेटी रुपये घेतले. सुरुवातीला आरोपीने त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. आरोपीने परतावा देणे बंद केल्यानंतर गुंतवणुदकारांनी पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक प्रकरणाची व्याप्ती विचारात घेऊन संबंधित गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक मोहन खंदारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×