Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

बसप्रवासात जेष्ठेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे मोटारीची काच फोडून ऐवजाची चोरीफरार

वारजे जकातनाका ते कर्वे पुतळा बसस्थानक प्रवासादरम्यान घडली घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली आहे. ही घटना १९ मार्चला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास वारजे जकातनाका ते कर्वे पुतळा बसस्थानक प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी वारजेत राहणार्‍या ६७ वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घातपाताच्या तयारीतील सराईताला अटक, पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला वारजे माळवाडीतील ब्रम्हचैतन्य सोसायटीत राहायला आहे. १९ मार्चला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास महिला वारजे जकातनाका ते कर्वे पुतळा बसस्थानक असा प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी कापूून नेली. बसमधून उतरताना महिलेला हातातून बांगडी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×