Breking News
रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारएचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणीश्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्यपुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीरप्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेटलष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूकपुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडीनिलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

येरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ

रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड घनदाट नागरी वन निर्मितीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

marathinews24.com

पुणे – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांनी येरवडा येथील खुले कारागृह परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड करून घनदाट नागरी वन निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी – सविस्तर बातमी

या उपक्रमासाठी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या मानव संसाधनचे संचालक नंदकिशोर नाईक, रोटरी प्रांत ३ हजार १३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर आणि सदस्य, येरवडा कारागृह प्रशासनाचे अधिकारी शामकांत शेडगे व इतर अधिकारी, रोटरी डिस्ट्रिक्ट संचालक पर्यावरण श्री राजेंद्रकुमार सराफ उपस्थित होते.

येरवडा खुल्या कारागृहाच्या परिसरातील एक एकर जागेवर हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या घनदाट नागरी वनामुळे जैवविविधतेचे संवर्धन, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, कार्बन शोषण क्षमता वाढ आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मोठी मदत होणार आहे.

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. अशा प्रकाराची शहरी घनदाट जंगले ही शहराची फुफ्फुसे आहेत.केवळ वृक्षलागवड करून थांबणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाने स्वीकारली आहे. हा परिसर समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×