Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबारात २ हजार नागरिकांची तपासणी – डॉ. अंजली पाटील

मोतीबिंदूच्या १००, हर्नियाच्या २० शस्त्रक्रिया; २०० रक्तपिशव्यांचे संकलन, महिलांसाठी अत्याधुनिक मॅमोग्राफी युनिटचेही उद्घाटन

marathinews24.com

बारामती – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती यांच्यावतीने १५ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित विशेष आरोग्य तपासणी शिबिरात २ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी, १०० रुग्णांवर मोतीबिंदू तसेच २० रुग्णांवर हर्निया शस्त्रक्रिया करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस हे अभ्यास, संवेदनशीलता आणि निर्णयक्षम नेतृत्वाचे प्रतीक : चंद्रकांत पाटील – सविस्तर बातमी

नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांना सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला. नेत्र शस्त्रक्रिया शिबिरासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल डॉ. चिन्मय महात्मे व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला. तसेच शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती या संस्थेचाही गौरव करण्यात आला.

लॅप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रिया शिबिरामध्ये डॉ. लकडावाला व शल्यचिकित्सा विभागाच्या तज्ज्ञ पथकाने २० रुग्णांवर यशस्वी हर्निया शस्त्रक्रिया केल्या. अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना कमी वेदना, जलद पुनर्वसन व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा उपलब्ध झाल्या.

शिबारात निरोगी जीवनशैली, रक्तदानाचे महत्त्व, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, माता-बाल आरोग्य, पोषण व स्वच्छता याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाने लाभार्थी नोंदणी, समुपदेशन, जनजागृती व शिबिर व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

रक्तदान चळवळीला चालना देण्यासाठी रुग्णालय परिसरासह विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियानादरम्यान एकूण २०० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित उपक्रमामध्ये सर्व संबंधित विभागप्रमुख, प्राध्यापक, निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, परिचारिका, विद्यार्थी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी समन्वयाने कार्य करून उपक्रम यशस्वी केला आहे.

आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया, रक्तदान, आधुनिक निदान सेवा आणि व्यापक जनजागृती यांचा समन्वय साधणारे हे शिबीर समाजाभिमुख आरोग्यसेवेचे प्रभावी उदाहरण ठरले असल्याची भावना डॉ. अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रेडिओलॉजी विभागातील अत्याधुनिक मॅमोग्राफी युनिटचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यास मदत होणार असून बारामती व परिसरातील महिलांना आधुनिक निदान सेवा उपलब्ध होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×