Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुट

 Shaniwar Peth Burglary

दरोडेखोर उज्जेैनमधून अटकेत

marathinews24.com

पुणे – मोटार चालक व्यावसायिकावर गोळीबार करुन त्याच्याकडील २२ तोळ्यांचे दागिने लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांना मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरातून अटक करण्यात आली. आरोपींकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरोडेेखोरांविरुद्ध उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, नेपाळमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

नदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले – सविस्तर बातमी

अविनाश किशनचंद त्रिपाठी (वय ४३, सध्या रा क्रिस्टन सोसायटी, बकोरी, ता. हवेली, मूळ रा. उत्तर प्रदेश ), सुरेंद्रपाल रामचंद्र पाल (वय ३२, रा. भिलवल, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश), मोहम्मद शोएब वसीम खान (वय ३७, रा. आझादनगर, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील शिरसवाडी परिसरातून व्यावसायिक आणि त्याचा भाऊ मोटारीतून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी मोटार अडवली. मोटार चालकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करुन २२ तोळ्यांचे दागिने लुटले. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखळ करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी प्रतिबंध विभागाकडून तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासत आरोपी मध्य प्रदेशात पसार झाल्याची माहिती मिळाली. तांत्रिक तपासात आरोपी उज्जेैन परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक उज्जैनला रवाना झाले. शुक्रवारी तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तिघांना आरोपींची उज्जैनमधील न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवण्यात आली आहे. तिघांना घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अहिल्यानगर रस्त्यावरील बकोरी परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. गाेळीबार करुन आरोपी दुचाकीवरुन पसार झाले होते. आरोपीच्या दुचाकीवर दंड होता. सीसीटीव्ही चित्रीकरणात पोलिसांनी दुचाकीचे क्रमांक तपासले. तेव्हा दुचाकीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

दंडात्मक कारवाईचे ई-चलन तपासण्यात आल्यानंतर आरोपीचे नाव निष्पन्न झाले. लूटमार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार त्रिपाठी आहे. भारत आणि नेपाळमध्ये त्याने साथीदारांच्या मदतीने दरोडे टाकले होते. नेपाळ सरकारने त्याला पकडण्यासाठी रोख बक्षीस जाहीर केले होते. उत्तर प्रदेश पोलिसांशी २०१८ मध्ये विशेष पोलीस पथकाबरोबर (एसटीएफ) चकमकीनंतर त्रिपाठी याला अटक करण्यात आली होती. त्रिपाठी याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार असे गंभीर स्वरुपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार पाल, वसीम यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साेनवणे, राम राजमाने, वाहीद पठाण, दीपक लगड, कांचन जाधव, सहायक निरीक्षक अफरोज पठाण, श्रीकांत चव्हाण, मदन कांबळे, उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×