Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

दारू निर्मितीचे ३ हजार ४२० किलो ‘क्लोरल हायड्रेट’ जप्त

दारू निर्मितीचे ३ हजार ४२० किलो ‘क्लोरल हायड्रेट’ जप्त

पुणे ग्रामीणमध्ये अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची कारवाई

marathinews24.com

पुणे – बनावट दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ३ हजार ४२० किलो क्लोरल हायड्रेटसह ५ हजार ८०० लिटर रॉ केमिकल असा मोठा साठा अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने जप्त केला. पुणे ग्रामीणमधील समर्थ लॅबोरेटरीज, एमआयडीसी कुरकुंभ (ता. दौंड) येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. किशोर दत्तात्रय सुर्वे (वय ५२), शैलेश विठ्ठल ठाकूर (वय ५५), नवी सर्वर जमीर सिद्दीकी (वय ४०) आणि आदेश विठ्ठल पाचांगणे (वय ५८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात मंडप उतरविताना विजेच्या धक्क्याने अल्पवयीनाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पुणे ग्रामीण हद्दीतील समर्थ लॅबोरेटरीजमध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर युनिटला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सुमारे दीड महिना बारकाईने लक्ष ठेवून २९ जूनला कारवाई केली. कारवाईत ३ हजार ४२० किलो वजनाचा पिवळ्या रंगाचा स्फटिकासारखा संशयित पदार्थ, ५ हजार ८०० लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले. समर्थ लॅबोरेटरीज ही संशयित आरोपी किशोर सुर्वे यांच्या मालकीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच किशोर सुर्वे याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले आहे.

१५ लाख लिटर बनावट दारू निर्मितीचा डाव

जप्त करण्यात आलेला ३ हजार ४२० किलो क्लोरल हायड्रेट हा एमडी किंवा मेफेड्रॉन निर्मितीसाठी वापरला जातो का, याची तपासणी करण्यात आली. मात्र, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार हा पदार्थ प्रतिबंधित क्लोरल हायड्रेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रसायनापासून बनावट दारू तयार केली जाते. जप्त केलेल्या क्लोरल हायड्रेटपासून सुमारे १५ लाख लिटर बनावट दारू तयार करता आली असती, असा प्राथमिक अंदाज आहे.

यापूर्वी देखील बनावट दारूची निर्मिती केल्याची शक्यता

संशयितांनी यापूर्वीही अशाच प्रकारे बनावट दारू निर्मिती केली असण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सेंट्रीफ्यूगल मशीन तसेच जीएलआर मशीनची अंदाजे किंमत एक कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×