Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षीय चिमुरडा ठार

सिंहगड रोडवरील सोसायटीतील घटना

marathinews24.com

पुणे – सोसायटीमध्ये खेळत असताना लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी ( दि. १८) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोड परिसरातील निम्बजनगरमधील रिद्धी सिद्धी इमारतीत घडली आहे. शिवांश शैलेश धूत (वय ७) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

मुंढव्यातील तो खून नव्‍हे अपघात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांश हा सोसायटीच्या आवारात खेळत असताना लिफ्टमध्ये गेला होता. त्याने लिफ्टमधील बटणे दाबल्यानंतर लिफ्ट सुरू झाली. मात्र दुसरा मजला येण्यापूर्वीच लिफ्ट अचानक अडकली. बराच वेळ झाल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी अग्निशमन दलासह सिंहगड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लिफ्टची देखभाल सोसायटीमार्फत केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×