गुन्हे शाखेच्या युनीट ५ ची उत्तम कामगिरी
Marathinews24.com
पुणे – नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड करणार्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अटक केली आहे. टोळक्याने कोंढवा बुद्रूकमधील ९ वाहनांची तोडफोड करीत नुकसान केल्याची घटना १६ एप्रिलला पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यासोबत टोळक्याने दुसऱ्या ठिकाणीही वाहनाची तोडफोड करीत १७ हुन वाहने फोडली होती. याप्रकरणी नवाज अजीज शेख (वय २०) अल्फाज मुर्तजा बागवान (वय २० ) यश विजय सारडा (वय १९) अमन कबीर इनामदार (वय २० सर्व रा. इंदिरानगर पॉवर हाऊसचे मागे, गुलटेकडी पुणे) यांना अटक केली आहे.
पुण्यातील नामांकित व्यापाराच्या घरातून ८ तोळे सोने गायब
दुचाकीस्वार टोळक्याने १६ एप्रिलला पहाटेच्या सुमारास अश्रफनगर कोंढवा परिसरात दहशत माजवून ९ चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. त्याच टोळक्याने लक्ष्मीनगरमध्येही दुचाकी, रिक्षा, मोटारीची तोडफोड करुन दहशत माजवली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडूनही आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार युनीट पाचचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार राजस शेख आणि पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना आरोपींची माहिती मिळाली.
आरोपी नवाज शेख, अल्फाज बागवान, यश सारडा व अमन इनामदार यांनी साथीदारांसोबत वाहनांची तोडफोड केली असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी डायस प्लॉट गुलटेकडी येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेत अटक केली. चौकशीत त्यांनी साथिदारांसह वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, अकबर शेख, उमाकांत स्वामी, संजयकुमार दळवी, सुहास तांबेकर, पल्लवी मोरे, स्वाती तुपे यांनी केली.