Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

भारतातील शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप

भारतातील शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप

युरोपमध्ये होणाऱ्या रोबोटेक्स इंटरनॅशनल स्पर्धेत भारतातील ५० हुन अधिक सरकारी शाळेतील विद्यार्थी

marathinews24.com

पुणे –  एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे येथे पार पडलेल्या रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ मध्ये शासकीय शाळांमधील ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विजय मिळवून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. आता हे चौदा विजेते संघ युरोपातील एस्टोनिया येथे होणाऱ्या रोबोटेक्स इंटरनॅशनल २०२५ या जागतिक स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवणार आहेत.

लोणावळा विमेन्स फाउंडेशनतर्फे स्पोकन इंग्लिश स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग कोर्सचा शुभारंभ – सविस्तर बातमी 

या भव्य स्पर्धेत देशभरातील १६ राज्यांतील ५,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, जवळपास निम्मे विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी आणि शासकीय शाळांमधून आले होते. गर्ल्स फायरफायटिंग, लाईन फॉलोअर, आंत्रप्रेन्युअरशिप चॅलेंज, मिनी सुमो आणि फोक रेस अशा विविध श्रेणींमध्ये ५०० हून अधिक रोबोट्सचे सादरीकरण झाले. कृषी, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या वास्तव समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. फलटण, औरंगाबाद, दादरा-नगरहवेली, दमण-दिऊ, लडाख, नवी दिल्ली, देहरादून, पुणे, बेंगळुरू, चेन्नई अशा विविध भागांतील तरुण विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा दाखवत तंत्रज्ञानाला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवले.

या यशामागे एसटीएल रोबोएज प्रोग्रॅम, बीएमसी इंडिया गर्ल्स हू बिल्ड रोबोट्स, ZS इंडिया, ग्लोबंट इंडिया, WNS केअर्स फाऊंडेशन, BNY मेलॉन, EY फाऊंडेशन, FICCI FLO पुणे आदी कंपन्यांचे सीएसआर उपक्रम आहेत.

रोबोटेक्स इंडिया च्या संचालिका पायल राजपाल म्हणाल्या की, “या मुलांच्या यशात फक्त कौशल्य नाही, तर दुर्गम गावांमधून जागतिक पातळीवर झेप घेण्याची चिकाटी आणि समानतेचे स्वप्न दडले आहे,” आतापर्यंत रोबोटेक्स इंडियाच्या माध्यमातून १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, देशभरात ५०० रोबोटिक्स-एआय लॅब्स आणि ७,००० हून अधिक शासकीय शिक्षकांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. एस्टोनियामध्ये होणारी रोबोटेक्स इंटरनॅशनल स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी रोबोटिक्स महोत्सव असून यंदा तिचे २५ वे वर्ष आहे. ७५ हून अधिक देशांतील सहभागींमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची चमक ही देशासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×