दीनानाथ मंगेशकर गर्भवती महिला मृत्यू प्रकरण, नातेवाईकाला १० लाख रुपये भरण्यासाठी उपचाराला केली टाळाटाळ
Marathinews24.com
पुणे- गर्भवती तनिशा भिसे यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीमुळे अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनावर तसेच संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप झाले असून, पीडितेच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी करत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. त्यामुळे संबधित डॉक्टरवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
मैत्रिणीलाच दिले कॉफीतून गुंगीचे औषध अन…सविस्तर बातमी
तनिशा भिसे या गर्भवती महिलेला गंभीर प्रकृतीमुळे तातडीने उपचाराची आवश्यकता होती. मात्र, डॉ. घैसास यांनी तिच्या नातेवाईकाकडे उपचारासाठी तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम भरता न आल्यामुळे भिसे कुटुंबीयांनी तनिशाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचाराला उशीर झाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर देखील डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. या दबावामुळे त्यांनी मंगेशकर हॉस्पिटलमधील आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. याच संदर्भात आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.