Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : वर्दळीच्या मार्केटयार्ड परिसरात वाहतूक बदल

गगणविहार चौक ते वायजंक्शन, गंगाधाम सोसायटी परिसरात नो पार्किंग

Marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक सुरळित करण्यासाठी गगणविहार चौक ते वायजंक्शन, तसेच गंगाधाम सोसायटीला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित केले आहेत. आदेशानुसार,गगणविहार चौक ते वाय जंक्शनपर्यंत आणि गंगाधाम सोसायटीच्या हद्दीत येणार्‍या रस्त्यांवर वाहने पार्क करता येणार नाहीत. अस्ताव्यस्थ पार्किंगमुळे वारंवार होणारी वाहतूककोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

पिस्तुलासह काडतुस बाळगणाऱ्या इसमास बेड्या – सविस्तर बातमी

मेघदूत हॉटेलपासून वर्धमानपुरी सोसायटीपर्यंत सुमारे ६०० मीटरचा भाग ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित केला आहे. या भागात ‘पी-१’ आणि ‘पी-२’ पार्किंगही लागू केले आहे. १ मे २०२५ पासून आदेश लागू करण्यात येणार असून, नागरिकांनी पार्किंग ठिकाणीच वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिस विभागाने केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, निर्णयाची पूर्वसूचना स्थानिक दुकानदारांसह नागरिकांना देण्यात येणार असून, नागरिकांनी मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×