Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

काॅफीतून गुंगीचे ओैषध पाजून दागिने चोरणाऱ्या मैत्रिणीला अखेर बेड्या

गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीची फसवणूक; भारती विद्यापीठ पोलिसांकडून तरुणी अटकेत

Marathinews24.com

पुणे – मैत्रिणीला काॅफीतून गुंगीचे औषध देऊन कपाटातील दागिने चोरुन पसार झालेल्या तरुणीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. तरुणीकडून साडेपाच लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या तरुणीच्या मैत्रिणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी मैत्रिणी असून ६ मार्च रोजी तरुणी मैत्रिणीच्या घरी आली होती. त्यावेळी तिने मैत्रिणीला काॅफी करुन दिली. तिच्या काॅफीत नकळत गुंगीचे ओैषध मिसळले. मैत्रीण बेशुद्ध पडल्याने तिने कपाटातील पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन ती पसार झाली. मैत्रिणीला शुद्ध आल्यानंतर तरुणी पसार झाल्याचे लक्षात आले. तेव्हा शयनगृहातील कपाट उघडून दागिने चोरल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिने आरोपी तरुणीला जाब विचारला. तेव्हा दागिने चोरल्याची कबुली देऊन तिने दागिने परत करते, असे तिला सांगितले.

आरोपी तरुणीने दागिने परत केले. तिच्याकडे दागिने परत करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर मैत्रिणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पसार झालेल्या मैत्रिणीला भारती विद्यापीठ पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक निरीक्षक विश्वास भाबड, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, प्रियंका मोकाशी यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×