देवाचा प्रसाद घेण्यासाठी रांगेत थांबणे पडले महागात, जेष्ठ महिलेची 30 हजारांची सोन्याची चैन चोरली
Marathinews24.com
पुणे- मंदीराजवळ प्रसाद घेण्यासाठी रांगेत थांबणे एका 82 वर्षीय महिलेला महागात पडले आहे. परिसरातील गर्दीचा फायदा घेउन चोरटय़ांनी संबंधित महिलेच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चैन चोरुन नेली आहे. ही घटना 12 एप्रिलला रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती श्रीमंत भिकारदास गणपती मंदीराजवळ सदाशिव पेठेत घडली आहे. याप्रकरणी 82 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
जेष्ठ महिलेच्या गळ्यातील मोहनमाळ हिसकावली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सदाशिव पेठेत राहायला असून, 12 एप्रिलला संध्याकाळी आठच्या सुमारास श्रीमंत भिकारदास गणपती मंदीराजवळ प्रसादासाठी गेल्या होत्या. रांगेत उभा असताना गर्दीचा फायदा घेउन चोरटय़ाने जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चैन चोरून नेली. काही वेळानंतर महिलेला गळ्यात चैन नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सीसीटीवी फुटेजनुसार पोलिसांकडून चोरटय़ांचा शोध घेतला जात आहे. पोलीस अमलदार पाटील तपास करीत आहेत.